Thursday, March 26, 2009

महापुरुषांचा पराभव

३० जानेवारी १९४८ रोजी एका महापुरुषाचा पराभव झाला . नथूराम गोडसेने महात्मा गांधींवर झाड़लेल्या गोळ्या हे फ़क्त त्यांच्या विचारांना असलेल्या पराकोटीच्या विरोधाचं एक प्रतिक होतं. परंतु गांधींजी धारातीर्थी पडल्यावर जमावातील अहिंसेच्या पुजार्यांनी गोडसेचा केलेला कपालमोक्ष हाच त्या महापुरुषाच्या विचारांचा त्यांच्याच शिष्यांनी केलेला खरा पराभव होता. तब्बल साठ वर्षांनंतर देहूच्या भूमीवर त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटत आहे.संतांची शिकवण जनमानसात पोहचवणारी, समाजाचं प्रबोधन करणारी वाणी " दया क्षमा शांती : तेथे देवाची वसती " हे विसरून हातात वीणे ऐवेजी त्रिशूल भाले असल्याच्या आवेशात धावून जात असलेली बघताना कुठल्या संतसज्जनांना हायसं वाटलं असेल ते पंढरीचा विठोबाच जाणे। एकंदर प्रकारातून जे काही निष्पन्न् झाले ते सबंध महाराष्ट्राच्या समोर असल्यामुळे त्याचे वर्णन करण्यात फारसे तथ्य नाही । परंतु "वार " करी असा या शब्दाचा नविन अर्थ मराठी भाषेला प्रदान केल्या बद्दल साहित्य परिषदेने आणि मराठी सारस्वतान्नीत्यांचे मानावे तेवढे उपकार कमी पडतील ।

महा पुरुषांचे विचार त्यांची शिकवण समाजाच्या तळागाळात पोहचवण्यासाठी त्यांच्या शिष्यांएवढी पात्र दुसरी कुठलीच मंडलीअसू शकत नाही। पण आपण शिकवत असलेला पाठ तो शिकवत असणार्यालाच उमगलेला नसेल तर त्या वैचारिक कल्लोलातून उपजणारापराभव हा केवळती शिकवणी घेणार्याचा उरत नाही । "तुका म्हणे येथे पाहिजेd जातीचे । येरागबाल्याचे काम नोहे । " म्हणजे काय हे कदाचीत देहूच्या स्वयं घोषीत धर्म संरक्षकान्ना ठावूक नसावे ।

" चातुरवर्णयां मया सृष्टी । गुणकर्म विभागश : । " असं गीतेच्या चौथ्या अध्यायात माऊ लीन्नी